सोलापूर (पंढरपूर) -विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पस्तीस वर्ष जुने झालेल्या सोन्याच्या दागिन्यांची मोड केली जाणार आहे. त्या सोन्यात नाविन्यपूर्ण अलंकार तयार केले जाणार आहेत अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
करर्मचाऱ्याची उपस्थिती
विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कार्तिकी वारी संदर्भातील बैठक भक्तनिवास येथे घेण्यात आली. यावेळी विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह मंदिर समितीचे सदस्य उपस्थित होते. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुडलवाड यांच्यासह कर्मचारीही यावेळी उपस्थित होते.