सोलापूर -जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. गुरुवारी सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून एकूण 212 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 709 वर पोहोचली आहे. तर 355 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
दरम्यान एका दिवसात शहर आरोग्य प्रशासनाने 900 टेस्ट केल्या होत्या. त्यामधून फक्त शहरात 153 बाधित रुग्ण तर 747 निगेटिव्ह रुग्ण आढळले. तसेच 4 रुग्णांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे. तर 68 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजपर्यंत 314 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारी सायंकाळपर्यंत 278 अहवाल प्राप्त झाले होते. या मधून 219 निगेटिव्ह तर 59 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात 35 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश आहे. तर बरे झालेल्या 39 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये गुरुवारपर्यंत एकूण 1 हजार 172 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 41 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 672 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत 459 जण कोरोना आजारातून मुक्त झाले आहेत.
सोलापूर ग्रामीण तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या -
दक्षिण सोलापूर 351, अक्कलकोट 196 ,बार्शी 236 ,करमाळा 16, माढा 36, माळशिरस 24, मंगळवेढा 10, मोहोळ 81, उत्तर सोलापूर 123, पंढरपूर 92 , सांगोला 7 एकूण 1 हजार 172 रुग्ण झाले आहेत.