महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवारांच्या वाढदिवसावरील खर्च राष्ट्रवादी देणार शेतकऱ्यांना - शरद पवारांच्या वाढदिवसावरचा खर्च राष्ट्रवादी देणार शेतकऱयांना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस येत्या १२ डिसेंबरला आहे. या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या खर्चाला फाटा देत तो पैसा शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Dec 9, 2019, 10:42 PM IST

सोलापूर- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस येत्या १२ डिसेंबरला आहे. या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांच्या खर्चाला फाटा देत तो पैसा शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहे. राज्यातील संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून सुमारे ८० लाखांचा निधी संकलित करून शरद पवार यांना तो सुपूर्द करण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे.

हेही वाचा -शरद पवारांच्या वाढदिवशी राष्ट्रवादी साजरा करणार 'बळीराजा कृतज्ञता दिन'

या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुमारे २ लाखांचा निधी बळीराजासाठी संकलीत करून देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. चांदा ते बांद्यापर्यंत शेतीचे आणि पिकांचे सर्वदूर प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. पिकविम्याचे संरक्षण नाही. कर्जाचा बोजा वाढतच चालला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या अन्नदात्याला सावरण्यासाठी, त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी खुद्द शरद पवार आणि त्यांचा पक्ष पुढे सरसावला आहे.

येत्या 12 डिसेंबरला पवारांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या खर्चाला फाटा देऊन बळीराजाला उभारी देण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोलापुरातून दोन लाखांचा निधी संकलीत करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details