सोलापूर -सर्वत्र विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. दरम्यान, करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत अधिकृत माहिती जिल्हा पक्ष निरीक्षक सुरेश घुले आणि तालुका अध्यक्ष हनुमंत मांढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अपक्ष उमेदवार संजय शिंदेंना पाठिंबा
करमाळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने संजय घाटणेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून अर्ज माघारी घ्यायला सांगण्यात आले होते.
जिल्हा पक्ष निरीक्षक सुरेश घुले
हेही वाचा -शरद पवारांचे नाव येताच ईडीला दरदरुन घाम फुटला- खा. अमोल कोल्हे
करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने संजय घाटणेकर यांना उमेदवारी दिली होती. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून अर्ज माघारी घ्यायला सांगण्यात आले होते. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव ते अर्ज माघारी घेऊ शकले नाही. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला असून त्यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.