महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे - ncp protested against chief minister janadesh yatra in solapur

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा सोलापुरात येत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, पंढरपूर तालुकाध्यक्ष अरुण आसबे यांनी काळे झेडें दाखवून त्यांचा निषेध केला आहे.

सोलापूरात राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

By

Published : Sep 1, 2019, 11:59 PM IST

सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा सोलापुरात येत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, पंढरपूर तालुकाध्यक्ष अरुण आसबे यांनी काळे झेडें दाखवून त्यांचा निषेध केला आहे. तसेच "गो बॅक गो बॅक फडणवीस गो बॅक" अशा घोषणा देऊन त्यांचा विरोध केला आहे.

सोलापूरात राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

जिल्ह्यात आज मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन होणार होते. त्यासाठी सकाळीपासूनच जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जी लोक यात्रेच्या विरेधात निदर्शणे करीत होते त्यांना पोलिसांनी अटक केली. आमच्या आघाडी सरकारच्या काळात देखील विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न व्हायचा नाही, अशी प्रतिक्रिया अरूण साबळे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details