महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांना पाठिंबा दर्शवत सोलापुरात राष्ट्रवादीचे धरणे - सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय बातमी

मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलक
आंदोलक

By

Published : Dec 5, 2020, 3:35 PM IST

Updated : Dec 5, 2020, 4:55 PM IST

सोलापूर- दिल्ली येथे होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत, शनिवारी (दि. 5 डिसेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास धरणे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आणखी तीव्र लढा पुकरणार असल्याची माहिती, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.

बोलताना शहराध्यक्ष व शहर कार्याध्यक्ष

कृषी कायद्याविरोधात वज्रमुठ होत आहे

दिल्ली येथे मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारण्यात आले, लाठीमार करण्यात आला, याचे पडसाद देशभरात उमटत आहे. महाराष्ट्रातही समविचारी शेतकरी संघटना, कामगार संघटना राज्यभर आंदोलन करत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादीनेही सहभाग नोंदवला आहे. कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वज्रमुठ होत असल्याचे दिसत आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागण्या
  1. केंद्र सरकारने केलेले चुकीच्या कृषी विषयक कायदे रद्द करावेत.
  2. किमान आधारभूत किंमतीसाठी नवा कायदा आणावा.
  3. बाजार समिती व समितीच्या बाहेर दोन्ही ठिकाणी होणाऱ्या शेतमालाला समान कर लागू करावा.
  4. शेतमालाच्या खरेदीसाठी खासगी व्यपाऱ्यांचे रजिस्ट्रेशन आवश्यक करावे.

हेही वाचा -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Last Updated : Dec 5, 2020, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details