महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकांनी सुरू केलेल्या कारखान्याची सुद्धा वाट लावली; अजित पवारांचा सोपलांना टोला - बार्शीमध्ये अजित पवारांची सभा

नव्याने काढलेला आर्यन साखर कारखाना या सत्ताधाऱ्यांना नीट चालवता येत नाही. शेतकऱ्यांची बिले देता आली नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवारांचा सोपलांना टोला

By

Published : Oct 18, 2019, 12:02 PM IST

Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

सोलापूर - नव्याने काढलेला आर्यन साखर कारखाना या सत्ताधाऱ्यांना नीट चालवता येत नाही. शेतकऱ्यांची बिले देता आली नाहीत, असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यावर निशाणा साधला. आधीच्या लोकांनी सुरू केलेल्या भोगावती साखर कारखान्याची सुद्धा यांनी वाट लावली. कारखाना चालवण्याची यांच्यात धमक नसल्याचेही पवार म्हणाले.

हेही वाचा - हर्षवर्धन जाधवांना 'ते' विधान भोवले; आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल

हेही वाचा - शौर्य सैनिकांचे अन् हे स्वतःची पाठ थोपटवतायत - शरद पवार

बार्शी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ आगळगाव येथे आयोजीत सभेत अजित पवार बोलत होते. भर पावसात अजित पवारांनी आगळगाव येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. कारखाना उघडणे सोपे असते पण, ते चालवणे अवघड असते. यांच्यात ती धमक नाही. हे लोकांची काय मदत करणार असेही पवार म्हणाले.

Last Updated : Oct 18, 2019, 12:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details