महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : आरोपी नानासाहेब डोकेचा मृत्यू, नरबळीसाठी प्रतिक शिवशरणची केली होती हत्या - श्री संत दामाजी साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब डोके

सोलापूरच्या मंगळवेढा येथील नरबळी प्रकरणातील आरोपी श्री संत दामाजी साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब डोके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे येथे उपचार घेत असताना नानासाहेब डोकेचा मृत्यू झाला. त्याने माणचूर येथील प्रतिक शिवशरण याचा 27 ऑक्टोबर 2018 रोजी बळी घेतला होता. याप्रकरणी डोके अटकेत होते.

Nanasaheb Doke
Nanasaheb Doke

By

Published : Oct 2, 2021, 11:20 AM IST

पंढरपूर (सोलापूर): मंगळवेढा तालुक्‍यातील माचणूर येथील प्रतिक शिवशरण याचा 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी मृत्यू झाला होता. नरबळी प्रकरणात कारागृहात असलेला आरोपी श्री संत दामाजी साखर कारखान्याचा माजी संचालक नानासाहेब डोके याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे येथे उपचार घेत असताना नानासाहेब डोकेचा मृत्यू झाला.

नक्की काय आहे प्रकरण?

पाच दिवसांनी प्रतिकचा मृतदेह सापडला ऊसात

मंगळवेढा तालुक्‍यातील माचणूर येथील प्रतिक शिवशरण हा मुलगा 27 ऑक्‍टोबर 2018 रोजी शाळेच्या तासावरून घरी येऊन जेवण करून मित्राबरोबर फिरावयास गेला. मात्र नंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडिलांनी तपास घेतला. तेव्हा त्याचा मृतदेह ऊसाच्या फडात पाच दिवसांनी आढळून आला. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नरबळीच्या संशयावरून आंदोलन

प्रतिक शिवशरण याचा नरबळी दिल्याचा संशय त्यावेळेस व्यक्त केला गेला. त्यातच पोलीस तपासात प्रतिकचा मृत्यू नरबळीतून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तर आरोपी पकडण्यासही पोलिसांना विलंब झाला. त्यामुळे नागपूर-रत्नागिरी महामार्गावर माचणूर येथे ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर जनहित शेतकरी संघटनेने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करण्यात आले होते.

नरबळी प्रकरणी नानासाहेब डोके ताब्यात

प्रतिकच्या मृत्यूनंतर नरबळी प्रकरणी नानासाहेब डोके व त्यांच्या इतर साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. तपासात त्यांनी प्रतिकची नरबळी प्रकरणातून हत्या केल्याची कबुलीही दिली. त्यानंतर ते न्यायालयीन कोठडीत होते. गेले काही दिवस सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात नानासाहेब डोकेवर उपचार सुरू होते. पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान डोकेचा पुणे येथे काल (1 सप्टेंबर) रात्री मृत्यू झाला.

हेही वाचा -धक्कादायक! नागपूरमध्ये 11 वर्षीय मुलीच्या कौमार्याचा विक्रीचा प्रयत्न; तीन महिलांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details