महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रणजितसिंह डिसले यांना मिळालालेला पुरस्कार राज्यासह देशाचा गौरव : सभापती रामराजे नाईक-निंबाळकर - News about Ramraje Naik Nimbalkar

रजुतसिंह डिसले यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानपरिषदे मांडण्यात आला. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, सदस्य विक्रम काळे यांनी या अभिनंदनाच्या प्रस्तावास पाठींबा दिला.

Naik-Nimbalkar said award given to Ranjit Singh Disley was the pride of the state and  country
रणजितसिंह डिसले यांना मिळालालेला पुरस्कार राज्यासह देशाचा गौरव : सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

By

Published : Dec 16, 2020, 3:57 PM IST

पंढरपूर - रणजितसिंह डिसले यांना मिळालेला ग्लोबल टीचर पुरस्कार हा राज्यासह देशाचा गौरव आहे. त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून शिक्षण क्षेत्रात त्यांच्या संकल्पनांचा समावेश केला जाईल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

विधानपरिषदेत रणजीतसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतांना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, सदस्य विक्रम काळे यांनी या अभिनंदनाच्या प्रस्तावास पाठींबा दिला.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका जिल्हा परिषद शिक्षक म्हणून सेवेत असणाऱ्या रणजीतसिंह डिसले यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. रणजितसिंह डिसले यांना जागतिक स्तरावर ग्लोबल टीचर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या पुरस्काराची दखल घेऊन त्यांना राज्यपाल नवनियुक्त होणाऱ्या आमदारमधून आमदारकी द्यावी, अशी मागणी दरेकर यांनी विधान परिषदेत केली.

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी डिसले यांनी क्युआर कोडची अभिनव संकल्पना राबवून शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवून आणल्याचे सांगितले. मंत्री ॲड.अनिल परब म्हणाले, रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन, या संकल्पनेचा शिक्षण क्षेत्रात वापर करुन अभ्याक्रमाचा दर्जा उंचाविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details