सोलापूर- मोदी सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज सोलापुरात 20 वर्षातील सर्वात मोठा मोर्चा निघाला. या मोर्चाचे नेतृत्व शहर काझी अमजदअली काझी यांनी केले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात सोलापुरात मुस्लीम बांधवांचा मोर्चा - Muslim community agitation
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या 59 चित्रांवरून सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) 3 सरकारला नोटीस बजावली. तरीही सोलापुरात हा मोर्चा शांततेच्या मार्गाने निघाला.

हेही वाचा - हैदराबाद-उन्नाव नाही सोलापुरात, मध्यप्रदेशच्या सुखरुप गुडियाची कहाणी
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान देणाऱ्या 59 चित्रांवरून सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवारी) 3 सरकारला नोटीस बजावली. तरीही सोलापुरात हा मोर्चा शांततेच्या मार्गाने निघाला. मोर्चाची सुरुवात शहर काझी कार्यालयापासून झाली. तो मोर्चा पुढे किडवाई चौक, पेंटर चौक, बारा इमाम चौक, विजापूर वेस, बेगम पेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सुरुवातीला पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना भाषणबंदी केली होती. तरीही नेतृत्वकर्त्या काझी यांनी या मोर्च्याच्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली.