महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातवा वेतन लागू करा; सफाई कामगारांचा महानगरपालिकेच्या दारात ठिय्या - भाजप

सोलापूर महानगरपालिकेतील सफाई कामगारांनी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी आज महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. तसेच जर १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारादेखील यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सफाई कामगारांचा महानगरपालिकेच्या दारात ठिय्या

By

Published : Aug 3, 2019, 9:11 PM IST

सोलापूर- मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी करत सफाई कामगारांनी आज सोलापूर महापालिकेत निदर्शने केली. जर १५ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारादेखील यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सफाई कामगारांचा महानगरपालिकेच्या दारात ठिय्या

महापालिकेत भाजप सरकारची सत्ता आहे. परंतु सत्तेत आल्यापासून सरकारने महापालिकेत काम करणाऱ्या कामगार व कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणतेही ठोस घोषणा केले नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज महापालिकेत निदर्शने केली. यावेळी मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी त्यांनी केली.

तर शहरात जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत सर्व प्रकारच्या सेवा देणाऱ्या कामगारांसाठी त्यांच्या मागण्याबाबत महापालिका पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी उदासिनता का दाखवितात ? असा सवाल कामगार नेते अशोक जानराव यांनी यावेळी उपस्थित केला.

ABOUT THE AUTHOR

...view details