महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा, माढेकरांनी एकत्र साजरा केला गणेशोत्सवसह मोहरम - जातीय

माढ्यातील  कसबा पेठेतील जगदंबा  मंडळ, शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, सुवर्णयोगी नांदकनाथ मंडळ या तिन्ही गणेशोत्सव मंडळानी एक आदर्शवत पाऊल उचलले असून  गणपती बरोबरच शेजारीच पंजाचीही  स्थापना केली आहे.  यातून माढेकरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले आहे.

सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा

By

Published : Sep 9, 2019, 3:06 PM IST

सोलापूर- जिल्ह्यातील माढा शहरातील तीन गणेश मंडळानी गणेशोत्सव आणि मोहरम सण एकत्रित साजरा करत समाजीक जातीय सलोख्यासाठी एक आदर्श निर्माण केले आहे. माढ्यातील कसबा पेठेतील जगदंबा मंडळ, शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, सुवर्णयोगी नांदकनाथ मंडळ या तिन्ही गणेशोत्सव मंडळानी एक आदर्शवत पाऊल उचलले असून गणपती बरोबरच शेजारीच पंजाचीही स्थापना केली आहे. यातून माढेकरांनी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवले.

सोलापुरात जातीय सलोख्याची अनोखी परंपरा


कसबा पेठेतील जगदंबा गणेश मंडळ व शुक्रवार पेठेतील अजिंक्यतारा गणेश मंडळ, नांदकनाथ गणेश मंडळ यामंडळाकडून गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविले जाते. तब्बल ६८ वर्षांनंतर मोहरम हा सण गणेशोत्सवाच्या काळात मागीलवर्षापासून येत असल्याने गतवर्षीपासूनच या मंडळांकडून असा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.


मोहरम सण हा दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येत असल्याने वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जात होता. मागील वर्षापासून मोहरम सणही गणेशोत्सव काळात आल्याने या तिन्ही मंडळाच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी एका क्षणाचा ही विलंब न करता गणपतीच्या मूर्तीशेजारीच मोहरमचे पंजा व ताबूतची ही एकाच ठिकाणी स्थापना केली. सायंकाळी साडेसहा वाजता मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करुन गणेश मंडळाच्या सदस्यांसमवेत मोठ्या भक्तिमय वातावरणात ताबूतची प्रतिष्ठापना केली आहे.


जगदंबा गणेश मंडळाने मिरावलीसाब याच्या सवारीचे पंजे, श्रीमंत सुवर्णयोगी नादकनाथ मंडळाने नंदलालजी सवारी याचे पंजे, अजिंक्यतारा गणेश मंडळाच्या तंबुत पठाणसाब याचे पंजे ठेवण्यात आले आहेत.
नादकनाथ मंडळाचे संजय गोटे, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे, रमेश जबडे, जगदंबा मंडळाचे अध्यक्ष महेश भांगे, अमोल कानडे, सचिन पाटील, अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष सतिश गोसावी, मोहम्मद बागवान, विजय ठोंबरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details