महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमपीएससी परीक्षेत माढा तालुक्याचा डंका, तालुक्याला मिळाले तीन अधिकारी - सोनाली मनोहर भाजीभाकरे न्यूज

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यात माढा तालुक्यातील तिघा तरुणांनी बाजी मारली आहे.

mpsc result 2020 : madha taluka got three officers
एमपीएससी परिक्षेत माढा तालुक्याचा डंका, तालुक्याला मिळाले तीन अधिकार

By

Published : Jun 20, 2020, 11:21 AM IST

माढा ( सोलापूर ) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून यात माढा तालुक्यातील तिघा तरुणांनी बाजी मारली आहे. निंमगाव (टे) गावच्या आदित्य अजिनाथ शेंडे याची तहसीलदार पदी निवड झाली आहे. तसेच कुर्डू गावातील सोनाली मनोहर भाजीभाकरे हिची नायब तहसीलदार म्हणून, तर विठ्ठलवाडी गावच्या नितेश नेताजी कदम याची वर्ग २ उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आहे.

तहसीलदार झालेल्या आदित्यचे आई-वडील जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक आहेत. अभ्यासात सातत्य ठेवत आत्मविश्वास अन् जिद्दीच्या जोरावर मी हे यश मिळवले असून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आई-वडिलांच्या कष्टांची जाण ठेऊन अभ्यासात गुंतावे. तरुणांनी सोशल मीडियावर टाईपपास न करण्याचे आवाहन आदित्यने केले आहे. आदित्यच्या बहिणीने देखील एमपीएससीची परीक्षा दिली होती. पण त्यांची संधी फक्त एका गुणाने हुकली.

विठ्ठलवाडीमधील इंदुमती कदम या अंगणवाडीच्या सेविकेच्या तर नेताजी कदम या शेतकऱ्याच्या लेकाने उपशिक्षणाधिकारी हे पद मिळवले. नितेश याचा मोठा भाऊ निलेश हे भारतीय सैन्य दलात, तर बहीण निरोपा या आरटीओ विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. नितेशच्या रुपाने तिसरा शासकीय अधिकारी कदम घराण्यात निर्माण झाला आहे. नितेश कदम याने खुल्या संवर्गातून राज्यात ८ वा क्रमांक पटकाविला आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी, माध्यमिक केंद्रीय नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे तर विज्ञान शाखेची पदवी पूणे येथून घेतली. त्याला पोलीस उपअधीक्षक सचिन कदम व सुदर्शन शिंगाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

कुर्ड गावची कन्या सोनाली मनोहर भाजीभाकरे हिची नायब तहसीलदार पदासाठी निवड झाली असून आपल्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या वडील आणि दोन भाऊ यांच्या कष्टाचे तिने चीज केले आहे. सोनाली हिचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. माध्यमिक शिक्षण आंतरभारती विद्यालय येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण हे कुर्डूवाडी येथील महाविद्यालयात तर एमबीएचे शिक्षण सोलापूर येथे पूर्ण करुन स्पर्धा परिक्षेचा अभ्यास तिने पुणे येथील युनिक स्टडी सर्कलमध्ये केला. सोनाली हिने याआधी सहावेळा एमपीएससीचा प्रयत्न केला व तीन मेन्सच्या परीक्षा दिल्या होत्या. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये त्यास हे यश लाभले आहे.

दरम्यान, आदित्य, सोनाली आणि नितेश यांच्या यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.

हेही वाचा -संततधार पावसाने उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ; विसर्ग सुरू

हेही वाचा -लांडोरला मिळाले जीवदान; कोरायजा आजारावर यशस्वी उपचार

ABOUT THE AUTHOR

...view details