महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येणारं वर्ष महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम जाऊ दे, खासदार सुप्रिया सुळेंचे विठ्ठला चरणी साकडे

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपूरमध्ये सहकुंटुब विठुरायाचे दर्शन घेतले. चालू वर्षी राज्यात काही ठिकाणी कमी जास्त पाऊस झाला. चालू वर्ष आणि येणार वर्ष हे महाराष्ट्राच्या जनतेला सुजलाम सुफलाम जाऊ दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घातले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी घातले आहे.

खासदार सुप्रिया सुळे विठूरायाच्या चरणी

By

Published : Oct 27, 2019, 4:39 PM IST

Updated : Oct 27, 2019, 7:35 PM IST

सोलापूर- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिवाळीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य देैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. येणारे वर्ष हे महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करणारे जाऊ दे, असे साकडे त्यांनी विठूरायाला घातल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

खासदार सुप्रिया सुळेंचे विठ्ठला चरणी साकडे

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंढरपूरमध्ये सहकुंटुब विठुरायाचे दर्शन घेतले. चालू वर्षी राज्यात काही ठिकाणी कमी जास्त पाऊस झाला. चालू वर्ष आणि येणार वर्ष हे महाराष्ट्राच्या जनतेला सुजलाम सुफलाम जाऊ दे, असे साकडे विठुरायाच्या चरणी घातले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी घातले आहे.

दरम्यान, यावेळी त्यांनी राजकीय भाष्य करणे टाळून सर्वाना दिवाळीच्या त्यांनी शुभेच्छा दिल्या. दर्शनावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पती सदानंद सुळे हेही उपस्थित होते. दरम्यान, २६ तारखेला कर्जत जामखेडचे विजयी उमेदवार रोहित पवार यांनीही पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. त्यांनी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. तर अजित पवार यांनी बारामतीमधून तब्बल १ लाख ६५ हजार मतांचे लीड घेऊन सर्व विरोधी उमेदवारांचे डिपॉजिट जप्त केले.

Last Updated : Oct 27, 2019, 7:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details