महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याचा शोध मोहिमेसाठी सरकारने हेलिकॅप्टर द्यावे, अन्यथा आमच्याकडून देऊ- रणजितसिंह निंबाळकर - Leopard search operation in Karmala Taluka

बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले आहे. करमाळा तालुक्यात पाहणी करण्यात आलेल्या खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वनाधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करावे, अशी मागणी केली आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची तयारी
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाची तयारी

By

Published : Dec 9, 2020, 3:57 PM IST

Updated : Dec 9, 2020, 4:37 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -करमाळा तालुक्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी राज्य सरकारने शोध मोहिमेकरता हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माडाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सरकारला अडचणी असतील तर आमच्याकडून खासगी हेलिकॅप्टर देण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशीही मागणी निंबाळकर यांनी केली.

करमाळा तालुक्यात गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी खोऱ्यातून आलेल्या बिबट्याने तीन जणांचा बळी घेतला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश आले आहे. करमाळा तालुक्यात पाहणी करण्यात आलेल्या खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी वनाधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर उपलब्ध करावे, अशी मागणी केली आहे.

बिबट्याचा शोध मोहिमेसाठी सरकारने हेलिकॅप्टर द्यावे
माजी आमदार नारायण पाटील यांची ही मागणी-बिबट्या अजूनही जेरबंद झाले नाही, त्यामुळे दिवसेंदिवस बिबट्याविषयी लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. राज्य सरकारने तत्काळ 20 ड्रोन कॅमेरे व पाच शार्पशूटर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वनविभागाला बिबट्याला पकडण्यात अपयश

अहमदनगर, बीड येथे 8 जणांचा ठार करून करमाळा तालुक्यात शिरलेल्या बिबट्याने 3 जणांचा बळी घेतला. त्यानंतर या बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाकडून देण्यात आले. बिबट्या ज्या उसात लपून बसला होता, तो पाच एकर उसाचा फडच जाळण्यात आला. आग लागल्यानंतर बिबट्या बाहेर आला. शार्पशूटरने गोळी मारली. मात्र त्यातूनही बिबट्या निसटल्याने संपूर्ण करमाळा तालुकाच नरभक्षक बिबट्याच्या दहशतीखाली आहे.

हेही वाचा-थरारक! शेतात राखणीकरता बांधलेल्या कुत्र्याचा बिबट्याकडून फडशा; मोबाईलमध्ये घटना कैद

दरम्यान, वनविभाग, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ या बिबट्याला पकडण्यासाठी रात्रंदिवस शोध घेत आहेत. मात्र, मंगळवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. बिबट्याला पकडण्यासाठी अंजनडोह, चिखलठाण, शेटफळ आदी परिसरात सुमारे 15 पिंजरे, 40 कॅमेरे, डॉग स्कॉड, वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी 5 हत्यारबंद पोलिसांसह 5 शार्पशूटरही तैनात करण्यात आले आहेत.

हेही वाचा-बिबट्याचा दोन दुचाकीस्वारांवर हल्ला, पिंजरे लावण्याची मागणी


बिबट्या वावर असलेला परिसर हा ऊस, तूर, ज्वारी व इतर पिके असलेला आहे. पिकाचे हजारो हेक्टरचे सलग क्षेत्र असल्याने यामध्ये त्याचा शोध घेणे अतिशय कठीण होत असल्याचेही वनविभागाने सांंगितले आहे. बिबट्याला पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तज्ज्ञांच्या उपस्थितीत बेशुद्ध करून बंदिस्त करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. तसे न झाल्यास त्याला ठार मारण्याचेही आदेश वनविभागाला मिळाले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत तरी बिबट्याला जेरबंद अथवा ठार मारण्यात वनविभागाला यश आले नव्हते.

Last Updated : Dec 9, 2020, 4:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details