करमाळा(सोलापूर)-कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र हाहाकार माजला असून भारतातही या संकटामुळे लॉकडाऊन केले आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांवर संचारबंदीच्या काळात उपासमारीची वेळ आली असून सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून करमाळ्यातील गरजू व गरीब कुटुंबांना अडचणीच्या काळात मदतीचा हात म्हणून किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे.
खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून करमाळ्यातील 2हजार कुटुंबाना धान्याचे वाटप - daily wage workers
लॉकडाऊन काळात काम न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेल्या करमाळा तालुक्यातील 2 हजार कुटुंबाना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून धान्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्याचे नियोजन करमाळा तालुका भाजपतर्फे करण्यात आले होते.

करमाळा तालुक्यात दोन हजार कुटुंबांना या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सर्व मदत उपक्रमात योग्य व गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचे सुयोग्य नियोजन भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केले. तसेच करमाळा तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालय पोलिस स्टेशन, सरकारी रुग्णालय,व पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमावेळी विठ्ठल भणगे, भगवान गिरी,किरण बोकन, महादेव फंड, शशिकांत पवार, दीपक चव्हाण, नरेंद्र ठाकूर, रामा ढाणे,अमरजीत साळुंखे यांनी सहकार्य केले.