सोलापूर :हिंदू जनजागृती समिती मार्फत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Halal Free Diwali movement) करण्यात आले. यंदाची दिवाळी हलालमुक्त (HJS Solapur Collector office Movement) साजरा करू असे आवाहन यावेळी करण्यात आले. सोलापूर सह देशात हलाल उत्पादनांची विक्री आणि मागणी ( Sale and Demand of Halal Products) वाढली आहे. यामधून जी कमाई केली ती दहशतवादी संघटनांना पुरवली जाते. दहशतवादी कारवायाखाली पोलीस प्रशासनकडून संशयित म्हणून ज्या आरोपींना अटक केली जाते,त्यांना सोडवण्यासाठी जमियत ए उलेमा हिंद (Jamiat e Ulema Hind) ही संघटना आर्थिक मदत करत आहे. हे सर्व हलाल कमाई मधून केले जाते असे आरोप यावेळी करण्यात आले.
Movement For Halal Free Diwali : हलालमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन - हलालमुक्त दिवाळी
हिंदू जनजागृती समिती मार्फत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन (Halal Free Diwali movement) करण्यात आले. यंदाची दिवाळी हलालमुक्त (HJS Solapur Collector office Movement) साजरा करू असे आवाहन यावेळी करण्यात आले. सोलापूर सह देशात हलाल उत्पादनांची विक्री आणि मागणी ( Sale and Demand of Halal Products) वाढली आहे. यामधून जी कमाई केली ती दहशतवादी संघटनांना पुरवली जाते. दहशतवादी कारवायाखाली पोलीस प्रशासनकडून संशयित म्हणून ज्या आरोपींना अटक केली जाते,त्यांना सोडवण्यासाठी जमियत ए उलेमा हिंद (Jamiat e Ulema Hind) ही संघटना आर्थिक मदत करत आहे.
![Movement For Halal Free Diwali : हलालमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे आंदोलन हलाल प्रमाणपत्रधारी खाद्यपदार्थ विरोधात एचजेएसचे आंदोलन](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16693188-thumbnail-3x2-hjs-andolan.jpg)
हलाल मधून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याच प्रयत्न-इस्लाम धर्मानुसार मटणाच्या बाबतीत हलाल मटणाची विक्री सुरू होती. एखाद्या प्राण्याचे मटण घेताना मुस्लिम धर्मातील नागरिक हलाल आहे का, हराम आहे याबाबत विचारणा करून घेत होते. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. प्रत्येक बाबतीत हलाल आहे का याची पडताळणी केली जात आहे असे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आरोप करण्यात आले आहे.यामधून एक प्रकारे समांतर हलाल अर्थव्यवस्था उभारली जात आहे. हे भारताच्या दृष्टीने धोकादायक आहे. यंदाची दिवाळी हलालमुक्त करू असे हिंदू जनजागृती समितीने आवाहन केले आहे.
हलाल म्हणजे नेमके काय?एखाद्या प्राण्याचे मटण घेताना हलाल की हराम हा प्रश्न केला जात होता. नेमका हलाल म्हणजे काय असा सवाल सर्वांना पडला आहे. एखाद्या प्राण्याचा मांस खाण्यासाठी त्याला कापताना त्याला पाणी पाजवून, देवाचे नाव घेत, कुराण मधील काही ओळी म्हणत कापतात. एका झटक्यात मुंडक छाटून कापलेला मटण खाण्यासाठी इस्लाम धर्मात मनाई आहे. इतर वास्तुबाबत देखील हलाल वस्तूंची माहिती समोर आली आहे. कष्टाने ,मेहनतीने कमाई केलेली आणि त्यातून खरेदी किंवा विक्री केलेल्या वास्तूला मागणी वाढली आहे. म्हणजेच लुबाडणूक करून, फसवणूक करून, चोरीची वस्तू खरेदी किंवा विक्री करणे हराम आहे असे इस्लाम धर्मात सांगितले आहे.