महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोटच्या मुलीनेच काढला आईचा काटा, जावयाशी असलेल्या अनैतिक संबंधातून खून - solapur mother murdered by daughter news

कुमठे गावात लक्ष्मीबाई शिवाजी माने या महिलेचा खून झाला होता. या खुनाचे रहस्य आता उलगडले आहे. लक्ष्मीबाई यांचा खून त्यांची मुलगी अनिताने प्रियकर असलेल्या दिरासोबत संगमनत करून केल्याचे उघड झाले आहे. आई आणि मुलगी दोघींचेही अनैतिक संबंध होते हे यातून पुढे आले आहेत.

solapur kumathe murdered news
पोटच्या मुलीनेच काढला आईचा काटा

By

Published : Nov 11, 2020, 10:47 AM IST

सोलापूर -तीन दिवसांपूर्वी कुमठे गावात लक्ष्मीबाई शिवाजी माने या महिलेचा खून झाला होता. या खुनाचे कारण आता स्पष्ट झाले आहे. लक्ष्मीबाई यांचा खून त्यांची मुलगी अनिताने प्रियकरासोबत संगमनत करून केल्याचे उघड झाले आहे. आईचे जावयासोबत आणि मुलीचे तिच्या दीरासोबत अनैतिक संबध होते. त्यातूनच ही हत्या झाली आहे.

मुलीने प्रियकराच्या मदतीने केला आईचा खून

हेही वाचा -डोंबिवलीत आढळला उतारा; भुताटकी दूर करण्याच्या उद्देशाने ठेवल्याचा अंदाज

सुडातून हत्या

सहा वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यापासून लक्ष्मीबाई माने एकट्याच राहात होत्या. मोठी मुलगी अनिताचा महादेव जाधव याच्यासोबत विवाह झाला होता. मात्र लक्ष्मीबाई यांचे जावई महादेव जाधव याच्यासोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे अनेकवेळा अनिता आणि लक्ष्मीबाई यांच्यात मोठे वाद झाले होते. आपल्या आईचे नवऱ्यासोबत संबंध असल्याच्या रागातून अनितानेदेखील तिचा दीर शिवनांद जाधव याच्यासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. आईवर असलेल्या रागामुळे अनिताने शिवानंदच्या मदतीने तिचा काटा काढायचे ठरवले. हत्येच्या आदल्या रात्री अनिता व शिवानंद कुमठे येथे लक्ष्मीबाई यांच्या घरी आले आणि मुक्काम केला. त्यावेळी अनिता आणि लक्ष्मीबाई यांच्यात पुन्हा मोठा वाद झाला. तेव्हा रागाच्या भरात अनिताने लक्ष्मीबाईचा गळा आवळला आणि आवाज बाहेर जाऊ नये यासाठी शिवानंदने लक्ष्मीबाईच्या तोंडात टॉवेलचा बोळा कोंबला. इतकेच नव्हे तर मृत्यु झाल्यानंतरही धारदार शस्त्राने आईच्या गुप्तांगावर वार केले. खून करुन शिवानंद आणि अनिता रात्रीच पळून गेले. सकाळी लक्ष्मीबाई यांचा मानलेला भाऊ विजय भोजे यांनी लक्ष्मीबाई यांना मृतावस्थेत पाहिले आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करुन अनिता व शिवानंद या दोघांना अटक केली.

ABOUT THE AUTHOR

...view details