पंढरपूर (सोलापूर)- जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून प्रशासनही हतबल झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात प्रथमच बुधवारी कोरोनाचे तब्बल 20 बळी गेले आहेत. तर 394 नव्या बाधितांची भर पडली असून एकूण संख्या 14 हजार 916 वर गेली आहे. सोलापूर ग्रामीण भागातील 74.4 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 439 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. पंढरपूर, बार्शी तालुके कोरोनाचे आगार बनले आहे.
धक्कादायक : सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू, ३९४ रुग्णांची भर - सोलापूर कोरोना न्यूज
जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे तब्बल 20 बळी गेले आहेत. तर 394 नव्या बाधितांची भर पडली असून एकूण संख्या 14 हजार 916 वर गेली आहे. सोलापूर ग्रामीण भागातील 74.4 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 439 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. पंढरपूर, बार्शी तालुके कोरोनाचे आगार बनले आहे.
![धक्कादायक : सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनामुळे 20 जणांचा मृत्यू, ३९४ रुग्णांची भर Solapur distric corona news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8745541-thumbnail-3x2-aa.jpg)
बुधवारी जिल्ह्यात 3 हजार 645 संशयितांची टेस्ट पार पडली. त्यात 234 पुरुष आणि 160 महिला पॉझिटिव्ह आढळले आहेत. दुसरीकडे पंढरपुरातील तीन रुग्णांचा,बार्शी तालुक्यातील 11 रुग्णांचा तर करमाळ्यातील दोन, माढ्यातील तीन, उत्तर सोलापुरातील एका रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाला रोखण्यासाठी शहर, तालुक्यातील गावात जनता कर्फ्यूसाठी पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि व्यापारी संघटना यांची बैठक घेण्यात आहे. या बैठकीत पुन्हा जनता कर्फ्यू लागू करण्याची मागणी होत आहे. जनता कर्फ्यूला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यातील काही गावामधे जनता कर्फ्यू, लॉकडाउन, रैपिड टेस्ट कोरोनाला रोखन्यासाठी उपाय केले जात आहे. मंगळवेढा, माढा तालुक्यात जनता कर्फ्यू चालू करण्यात आला आहे. तर काही तालुक्यात जनता कर्फ्यू लागू होणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करून संसर्ग रोखण्यात प्रयत्न करत आहे. मात्र ही यंत्रणा कोलमोडून पडताना दिसत आहे. त्यामुळे अधिकारीही हतबल झाले आहेत.
तालुकानिहाय रुग्णसंख्या व मृत्यू
मंगळवेढा 627 (15),सांगोला 842 (9),पंढरपूर 3,266 (70),बार्शी 2,833 (117),माळशिरस 1,917 (38),माढा 1,360 (47),द. सोलापूर 1,097 (23),करमाळा 964 (25),अक्कलकोट 743 (44),मोहोळ 702 (29),उ. सोलापूर 565 (22), एकूण 14 हजार 916 (439)