सोलापूर- शहर पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत निरनिराळ्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने जळून खाक झाली आहेत. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
सोलापुरात पोलिसांनी जप्त केलेली वाहने आगीत जळून खाक - seazed
सोलापुरात पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग... घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल... शेकडो वाहने जळून खाक
सोलापुरात पोलिसांनी जप्त केलेली वाहने आगीत जळून खाक
शहर पोलिसांनी वेगवेगळ्या केसमध्ये जप्त केलेली वाहने शहर पोलीस आयुक्तालयाच्या पाठीमागे असलेल्या सदर बाजार पोलीस स्टेशन परिसरात ठेवण्यात आली होती. मात्र, आज दुपारी या वाहनांना आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये अनेक वाहने जळून खाक झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.