सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा सस्पेंस आज संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील या पिता-पुत्रांना कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने मोहिते-पाटलांना मैदानात उतरविले तर माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून मोहिते-पाटील पुता-पुत्रांपैकी एकाला संधी? - fight
अनेक राजकीय घडामोडीनंतर आता मोहिते-पाटलांचे नाव पुढे आल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाल आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
![राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून मोहिते-पाटील पुता-पुत्रांपैकी एकाला संधी?](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-2814788-397-26fca344-8452-493d-a1a6-409555fc7fb2.jpg)
रणजितसिंह मोहिते पाटील
माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार
राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या मोहिते-पाटलांचे कट्टर विरोधक म्हणून माढ्याचे संजय शिंदे यांना ओळखले जाते. विरोधासाठी विरोधाचं राजकारण म्हणून भाजप पुरस्कृत जिल्हा परिषद अध्यक्ष असताना ते राष्ट्रवादीत गेले होते. त्यानंतर शिंदे यांची माढा लोकसभेसाठी राष्ट्रवादीने उमेदवारीही दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात कुणाला उतरवायचे याची चर्चा भाजपात सुरु होती.