पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील अकलूज ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान चालू आहे. त्यात आता धैर्यशील मोहिते पाटील यांनी विरोधी पक्षावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप लावला आहे. अकलूज ग्रामपंचायत निवडणूकीत वेगळे वळण लागले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या अकलूज ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. अकलूजचे विद्यमान सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक तसेच सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे चेअरमन विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडातील सर्वत मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. 17 ग्रामपंचायत जगासाठी ही लढत होत आहे. तर त्यातील एक जागा बिनविरोध निवडून आल्यामुळे निवडणूकीचे वातावरण तापले आहे.