महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद, दिड लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त - सोलापूर गुन्हे वार्ता

मोबाईल चोरी करणाऱ्या तीन संशयीत चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या चोरट्यांकडून 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Mobile theft gang nabbed in solapur
हिसका मारून मोबाईल चोरी करणारी टोळी जेरबंद

By

Published : Nov 17, 2020, 6:44 AM IST

सोलापूर-शहरातील विविध भागात मोबाईल चोरी करणाऱ्या तीन संशयीत चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. या चोरट्यांकडून 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या तिघांना चोरीचा मोबाईल विक्री करताना रंगेहाथ पकडले आहे. आंबदास उर्फ बबलू शेखर जाधव(23) रा.सेटलमेंट फ्री कॉलनी, दीपक मोहन जाधव (23) रा.सेटलमेंट फ्री कॉलनी, मोहित नागेश जाधव (21) रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वैशाली कडुकर यांची प्रतिक्रिया

पोलीसांना मिळाही होती माहिती

विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन संशयीत मोबाईल चोरटे चोरीचा मोबाईल विक्री करिता येणार असल्याची माहिती डीबी पथकाला गुप्तहेरा मार्फत मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विजापूर रोडवरील कुबेर कॉम्प्लेक्स येथे सापळा लावला होता. डीबी पथकाच्या पोलिसानी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, चोरीचा मोबाईल विक्रीसाठी आल्याचे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले. या तिघांची कसून चौकशी करून विजापूर नाका, फौजदार चावडी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून जाताना मोबाईल हिसका मारून चोऱ्या केल्याची कबुली या तीघांनी दिली. पोलिसांनी तीनही संशयीत चोरट्यांकडून एकूण 6 मोबाइल आणि तीन दुचाकी वाहने असा एकूण 1 लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

चोरीचा प्लॅन-
दोघे संशयीत चोरटे अगोदर रेखी करत होते. त्यानुसार दोघे एका वाहनावर जात होते. मोबाईल पाहण्याच्या धुंदीमध्ये मोबाईलधारक हे आजूबाजूला न पाहता मोबाईलमध्ये पाहत हळूहळू चालत. याचाच फायदा घेत, दोन्ही संशयीत दुचाकीवर हळू जवळ येत आणि मोबाईलला हिसका मारून वेगात जात होते. त्या तिघांमधील एक संशयीत आरोपी मागून दुचाकी वाहनावर येत. काही मोबाईल धारक विरोध केला किंवा हाणामारी झाली, तर मागून आलेला संशयीत सोडवासोडवी करण्याचा प्रयत्न करीत असे. या प्लॅननुसार तिघांनी अनेक मोबाईल चोरीचे प्रयत्न यशस्वी केले. पण शेवटी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details