महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात वीजबिल माफीसाठी मनसेचा विराट मोर्चा; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा - electricity bill mns protest

वाढीव वीजबिलांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलापूर शहरात आज विराट मोर्चा काढण्यात आला. चार पुतळा परिसरातून आरंभ होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालवयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.

mns protest solapur
सोलापुरात वीजबिल माफीसाठी मनसेचा विराट मोर्चा

By

Published : Nov 25, 2020, 5:12 PM IST

सोलापूर - वाढीव वीजबिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलापूर शहरात आज विराट मोर्चा काढण्यात आला. चार पुतळा परिसरातून आरंभ होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्व मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले. यात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला होता. मोर्चात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडला होता.

सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण वीजबिल माफ झाले पाहिजे. तसेच, बचतगटातील मायक्रो फायनान्सचे संपूर्ण कर्ज माफ झाले पाहिजे, अशा प्रमुख मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता. पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीमुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होती. तरी देखील मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.

माहिती देताना मनसे नेते बाळा नांदगावकर

वीजबिल माफ न केल्यास जनता माफ करणार नाही

कोरोना महामारीमुळे जवळपास 4 महिने टाळेबंदी लागू झाली होती. या टाळेबंदीत महावितरण विभागाने मीटर रिडींगसाठी घरी न येता अंदाजित वीजबिले ग्राहकांना पाठवली आहेत. त्यातच लॉकडाऊनमुळे बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे. अनेकांचे लघू उद्योग डबघाईला आले आहेत. शासनाने त्वरित अव्वाच्या सव्वा आलेली लाईट बिले माफ करावी, अन्यथा जनता माफ करणार नाही, असे माजी मंत्री नांदगावकर म्हणाले.

मायक्रो फायनान्स किंवा बचत गटाचे कर्ज माफ करावे

हातावर पोट असलेल्या नागरिकांनी लॉकडाऊनपूर्वी बचत गटातून कर्ज काढले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे हाती असलेले काम गेले. तसेच, लघू उद्योगांवर उपजीविका भागवणाऱ्या महिलांना देखील लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. तर, राज्य सरकारने मायक्रो फायनान्सने घेतलेली सर्व कर्ज प्रकरणे किंवा बचत गटाची सर्व कर्ज प्रकरणे माफ करण्याचा आदेश पारित करावा, अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली.

हेही वाचा -पंढरपुरात दोन दिवसाची संचारबंदी लागू, वारकरी व भक्तास येण्यास मनाई

ABOUT THE AUTHOR

...view details