महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजबिल वसुलीविरोधात पंढरपूरमध्ये मनसेचे आंदोलन - पंढरपूरमध्ये मनसेचे आंदोलन

राज्य सरकार व वीज कंपनीच्या घरगुती वीजबिल वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या वतीने वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून सरकारचा निषेध करण्यात आला. मनसे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

वीजबिल वसुलीविरोधात पंढरपूरमध्ये मनसेचे आंदोलन
वीजबिल वसुलीविरोधात पंढरपूरमध्ये मनसेचे आंदोलन

By

Published : Jan 20, 2021, 10:55 PM IST

पंढरपूर -राज्य सरकार व वीज कंपनीच्या घरगुती वीजबिल वसुलीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पंढरपूरमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेच्या वतीने वीज अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून सरकारचा निषेध करण्यात आला. मनसे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.

सरकारने घरगुती वीजबिल माफ करावे

कोरोनामुळे अनेकांचे वीजबिल थकले आहे. मागील काही दिवसांपासून थकीत वीजबिल वसुलीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांकडे तगादा लावला आहे. सध्याची परिस्थिती पाहाता हे वीजबिल भरणे नागरिकांना शक्य नसल्यामुळे, राज्य सरकारने घरगुती वीजबिल माफ करावे अशी मागणी यावेळी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.

वीजबिल वसुलीविरोधात पंढरपूरमध्ये मनसेचे आंदोलन

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध

काही दिवसांपूर्वी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी नागरिकांनी वीज वापरली आहे, त्यामुळे त्यांना बिल भरावेच लागणार असल्याचे म्हटले होते. जर नागरिकांनी वीजबिल भरले नाही तर त्यांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला होता. दरम्यान ऊर्जा मंत्र्यांच्या या वक्तव्याचा मनसेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने अभियंत्याच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अनिल बागल, जिल्हा संघटक सागर बडवे, शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी, शुभम धोत्रे, प्रथमेश धुमाळ यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details