महाराष्ट्र

maharashtra

राज्यात सरकारमध्ये तर सोलापुरात अधिकार्‍यांमध्ये समन्वय नाही : आमदार सुभाष देशमुख

By

Published : Jun 16, 2020, 9:01 PM IST

तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही, सोलापुरातही तशीच स्थिती आहे. येथील अधिकार्‍यांमध्ये ताळमेळ नाही. जिल्हाधिकारी एक आदेश काढतात तर, पोलीस आयुक्त एक आदेश काढतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या दोघांसह पालिका आयुक्त, सिव्हीलचे वैद्यकीय अधीक्षकांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास शहराची परिस्थिती नक्की सुधारेल, असे आमदार देशमुख म्हणाले.

माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख
माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर - राज्यात तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे अनागोंदी कारभार सुरू आहे. तशीच काहीशी स्थिती सोलापुरात आहेत. येथील तीन प्रमुख अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने बिकट परिस्थिती झाली आहे, अशी टीका माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या दुसर्‍या टर्मला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त सरकारच्या वर्षभराच्या कार्याची माहिती देण्यासाठी लोकमंगल बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत आमदार देशमुख उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार देशमुख म्हणाले, केंद्राने कोरोनासाठी राज्याला जवळपास 28 हजार 104 कोटी रुपये विविध स्वरुपात दिले आहेत. तर, अजूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप मदत करण्यास तयार आहे. मात्र, तिघांचे सरकार असल्याने त्यांच्यात समन्वय नाही. सोलापुरातही तशीच स्थिती आहे. येथील अधिकार्‍यांमध्ये ताळमेळ नाही. जिल्हाधिकारी एक आदेश काढतात तर, पोलीस आयुक्त एक आदेश काढतात. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. या दोघांसह पालिका आयुक्त, सिव्हीलचे वैद्यकीय अधीक्षकांनी एकत्र येऊन निर्णय घेतल्यास शहराची परिस्थिती नक्की सुधारेल, असे आमदार देशमुख म्हणाले.

सोलापुरात सचिव स्तरावरील अधिकारी नियुक्त करा -

सिव्हिलमध्ये अगोदरच 25 टक्के पदे रिक्त होती, त्यात आता कोरोना आला. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालय बंद झाले आणि सिव्हिलवरचा ताण वाढला. त्यामुळे तेथील यंत्रणा विस्कळीत झाली आहे. सोलापुरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अधिकार्‍यांमध्ये समन्वय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे सोलापुरसाठी एक कायमस्वरूपी सचिव स्तरावरील अधिकारी नेमण्याची मागणी केली असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details