महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संजय शिंदेंनी राष्ट्रवादीला बनवले 'मामा', भाजपला दिला पाठिंबा - महाराष्ट्र सत्ता स्थापन

करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीमध्ये करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार उभा होता. घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष असलेल्या शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

संजय शिंदे

By

Published : Oct 31, 2019, 9:20 PM IST

सोलापूर- करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडूण आलेले संजयमामा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. संजयमामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन करमाळा मतदारसंघातून निवडून आले आहेत. करमाळा मतदारसंघातील विकास कामांसाठी सत्तेसोबत राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा - 55 वर्षांनी शेकापच्या बालेकिल्ल्यावर भगवा फडकला; 'या' कार्यकर्त्याचा 'नवस' पूर्ण

करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडणुकीमध्ये करमाळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार उभा होता. घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार उभा असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्ष असलेल्या शिंदे यांना पाठिंबा दिला होता. तरीही शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा - माढ्यात एमआयडीसी सुरू करण्यासाठी आंदोलन; संघर्ष समिती स्थापन करून लोकचळवळ

संजय शिंदे हे लोकसभा निवडणुकीच्या वेळी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार होते. माढा लोकसभा मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता झालेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांनी करमाळा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.

  • विकासासाठी सत्तेसोबत राहण्याचा निर्णय -

मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले. उजनी धरणावरचा ताण हलका करण्यासाठी भीमा व सीना नदीवर बॅरेजेस होणे आवश्यक आहे. हे सर्व प्रश्न सत्तेच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन करण्यास नकार दिला आहे. भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्तेसोबत राहून विकास कामे मार्गी लावण्यासाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details