महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'प्राण जाये पण पाणी न जाये', उजनीच्या पाणी प्रश्नावरून आमदार प्रणिती शिंदे संतापल्या - सोलापूर पालकमंत्री दत्ता भरणे न्यूज

उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी सोलापूरचे पालकमंत्री आणि इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी चोरल्याचा आरोप अनेक राजकीय नेत्यांसह शेतकरी संघटनांनीही केला आहे. त्यावरून आता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी 'प्राण जाये पण पाणी न जाये' असे सूचक वक्तव्य केले आहे.

solapur
सोलापूर

By

Published : May 8, 2021, 3:06 PM IST

सोलापूर -उजनी धारणातील 5 टीएमसी पाणी चोरल्याचे प्रकरण सध्या चांगलेच पेटले आहे. यावरून आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यामुळे आता उजनी पाणी प्रश्नावरून सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'प्राण जाये पण पाणी न जाये', उजनीच्या पाणी प्रश्नावरून आमदार प्रणिती शिंदे संतापल्या

स्थानिक नेते संतापले

सोलापूर जिल्ह्यासाठी बांधलेले उजनी धरण सोलापूरच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे मूळ इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना वळविले असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूर तालुक्याला वळविले जात असल्याने स्थानिक नेते पालकमंत्र्यांना धारेवर धरत आहेत. तर, पालकमंत्री हे 5 टीएमसी पाणी सांडपाणी आहे, असा तांत्रिक मुद्दा सांगत असल्याचे समोर आले आहे.

प्रणिती शिंदेंचा इशारा

येत्या जून ते ऑगस्ट महिन्यात सोलापूरकरांना एक दिवसाआड पाणी मिळावी, अशी आग्रही भूमिका प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे. 'सोलापूरच्या हक्काचे उजनी धरणातील पाणी कुणालाही घेऊ देणार नाही. प्राण जाये पण पाणी न जाये', असे म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी एक प्रकारे पालकमंत्र्यांना इशाराच दिला आहे. 'उजनीच्या पाणी पुरवठ्यासाठी दर दहा दिवसाला वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. त्याबाबत लेखी पाठपुरावा करणार आहे', अशी माहितीही प्रणिती शिंदे यांनी दिली.

उजनी पाणी प्रश्नावरून सोलापुरात पालकमंत्री बदलाची मागणी

उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्याला वळविल्याने सोलापूर जिल्ह्यातील नेते पालकमंत्री बदलून स्थानिक आमदाराला पालकमंत्री करा, अशी मागणी करत आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. तर, त्यांनीही पालकमंत्री होण्यासाठी अप्रत्यक्ष होकार दिला आहे.

हेही वाचा -सटाणा रोडवर विहिरीत कोसळली कार, कुटुंब प्रमुख वगळता इतर चौघांचा मृत्यू

हेही वाचा -सलाम! नगरमध्ये कर्तव्यदक्ष मुलाने केली भाजीपाला विक्रेत्या आईवर कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details