महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur News: राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; प्रणिती शिंदे यांची भाजपवर सडकून टीका - सरकारवर सडकून टीका

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत भाजपला टार्गेट केले आहे. सोलापूर शहर अल्पसंख्याक विभाग आणि महिला काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Solapur News
आमदार प्रणिती शिंदे

By

Published : Jul 15, 2023, 7:09 PM IST

माहिती देताना प्रणिती शिंदे

सोलापूर :महाराष्ट्र राज्यातील सरकार हे जनमताचे सरकार नसून पन्नास खोके आणि ईडीच्या दबावामुळे एकत्र आलेल्या लोकांचे सरकार आहे, जनतेच्या प्रश्नांशी यांना काही देणे-घेणे नाही. लोकांमधून निवडून आलेले सरकार लोकांची कामे करत असतात. हे सत्तेसाठी एकत्र आलेले सरकार आहे. जनतेच्या कामाशी किंवा त्यांच्या समस्यांशी काही देणेघेणे नाही अशी टीका, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

जिल्ह्यात फक्त एकच काँग्रेस आमदार : सोलापूर शहरातील काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर अल्पसंख्याक विभाग आणि महिला काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात सत्तेसाठी राजकीय समीकरणे बदलत गेल्याने, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे या मतदार संघात सक्रिय झाल्या आहेत. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात फक्त एकच काँग्रेस आमदार असल्याने, भाजपने देखील शहर मध्यवर डोळा ठेवला आहे.

जनमानसात भाजपचा ग्राफ खाली आला आहे : राज्यातील जनतेचा कौल सत्ताधारी भाजपच्या बाजूने नसल्यामुळे, भाजप राज्यातील महानगरपालिका निवडणुका घेत नाहीत. सद्यस्थितीत जनमानसात भाजपचा निवडून येण्याचा ग्राफ खाली पडलेला आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत. भाजपला हे ग्राफ वर आलेले वाटले तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील, अशी सडकून टीका काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

अधिवेशन अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त ठरणार : सोमवार १७ जुलैपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन अनेक मुद्द्यांवर वादग्रस्त ठरणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागानंतर सत्ताधारी आमदारांची संख्या जरी वाढली असली तरीसुद्धा ज्या कारणाने वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे गट मविआ सत्तेतून बाहेर पडून त्यांनी शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले होते. आता अधिवेशनात कशी मांडणी होणार हे औत्सुक्याचे आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : शिवसेना फोडल्यानंतर भाजपने लावला राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुरुंग; शिंद्यांची भाकरी करपली डील पक्की...
  2. Gajanan Maharaj Palkhi: संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापुरात उत्साहात स्वागत; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
  3. Praniti Shinde : भाजप आमचा एकमेव शत्रू; राज्यातील सत्तासंघर्षावर प्रणिती शिंदे यांची टीका

ABOUT THE AUTHOR

...view details