सोलापूर - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे अहिल्यादेवी यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय झालेला आहे. त्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर विद्यापीठाला दिलेल्या भेटीदरम्यान कुलगुरू फडणवीस यांना हा शब्द दिला आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या भव्य पुतळ्यासाठी सोलापूर विद्यापीठास सर्वतोपरी मदत करणार - आमदार पडळकर - ahilyadevi holkars statue solapur news
आमदार पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन कुलगुरुंची भेट घेतली. यावेळी त्यांनी अहिल्यादेवींचा भव्य अश्वरूढ पुतळा विद्यापीठात उभारण्यात येत असल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाहीदेखील दिली.
आमदार पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुतळ्यासंदर्भात कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्याशी चर्चा केली. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. महेश माने, प्रभारी कुलगुरू डॉ. देवेंद्रनाथ मिश्रा, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, डॉ. सुरेश पवार यांच्यासह माऊली हळणवर प्रा.सुभाष मस्के, अमोल कारंडे, शरणू हांडे, समाधान खांडेकर आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी आमदार पडळकर यांचे स्वागत करत विद्यापीठात उभारण्यात येणाऱ्या अश्वारूढ पुतळ्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. पडळकर यांनी अहिल्यादेवींचा भव्य अश्वारूढ पुतळा विद्यापीठात उभारण्यात येत असल्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.