सोलापूर - राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचे मंगळावरी निधन झाले. तालुक्यात राजकीय गटबाजीतही अजात शत्रू राहिलेल्या आमदार डोळस यांच्या निधनानंतर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोळस यांच्यावर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी तालुक्यातील सर्वच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतेले. यावेळी मोहिते पाटील परिवारातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी डोळस यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
माळशिरस राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार हनुमंत डोळस यांचं मुंबईत काल दीर्घ आजाराने निधन झाले, ते कर्करोगाने ग्रस्त होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २००९ आणि २०१४ या दोन टर्ममध्ये आमदार हनुमंत डोळस हे माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार राहिले आहेत.