महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाला आळा घालण्यासाठी सूचनांचे पालन करा - आमदार भालके - पंढरपुरातील लॉकडाऊन

पंढरपुरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, तरीही नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले आहे.

आमदार भारत भालके
आमदार भारत भालके

By

Published : Aug 8, 2020, 7:34 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत नागरिकांनी सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले आहे.

आमदार भारत भालके यांचे आवाहन

तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रशासनाच्या वतीने मोफत रॅपिड ॲंटीजेन टेस्टची मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी, कोरोना विषाणुच्या आजाराबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता आरोग्य विभागाने दिलेल्या सल्ल्यानुसार दक्षता घ्यावी, आजाराबाबत कुठलीही माहिती लपवू नये, स्वत:ची व कुटूंबाची तसेच जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास सहकार्य करावे, असेही आमदार भालके यांनी सांगितले.

हेही वाचा -वीज केंद्रात जमिनी गेल्या अन् नशिबी आला संघर्ष; अखेर प्रकल्पग्रस्तांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन, आरोग्य सेवा बजावणारे डॉक्टर्स, कर्मचारी यांना असेच सहकार्य कायम करुन आपण सर्वजन मिळून या संकटावर मात करु, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा -भाजप खासदार सुनील मेंढेंनी लॉकडाऊनचे नियम मोडत भररात्री उघडायला लावले सलून, व्हिडिओ व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details