महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नियमानुसार धान्य वाटप करा; सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सूचना - corona karmala

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सोलापूर-उस्मानाबाद सीमा बंद करण्यात आली आहे. या ठिकाणचा आढावा देखील कांबळे यांनी घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध ठाकाणांचा आढावा घेतल्या नंतर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

anirudh kamble visit karmala
तालुक्याचा आढावा घेताना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे

By

Published : May 2, 2020, 2:20 PM IST

सोलापूर- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा पाथुर्डी येथील स्वस्त धान्य दुकानांना भेट दिली. कांबळे यांनी त्याठिकाणची परिस्थिती समजून घेत स्वस्त धान्य दुकानदारांना नियमानुसार धान्य वाटण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तालुक्याचा आढावा घेताना जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे

स्वस्त धान्य दुकानांबरोबरच कांबळे यांनी वरकुटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. त्याचबरोबर, त्यांनी गौडरे येथील विलगीकृत करण्यात आलेल्या नागरिकांची भेट घेतली. आवटी तसेच कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सोलापूर- उस्मानाबाद सीमा बंद करण्यात आली आहे. या ठिकाणांचा आढावा देखील कांबळे यांनी घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध ठाकाणांचा आढावा घेतल्या नंतर तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती अनिरुद्ध कांबळे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेला सोलापूर जिल्हा हा आता रेड झोनमध्ये गेला आहे.

हेही वाचा-घरपोच दारूच्या नावाखाली फसवणूक, जाहिरातीच्या माध्यमातून केली जातेय ऑनलाईन लूट

ABOUT THE AUTHOR

...view details