महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ; आमदार अमोल मिटकरींचा आरोप - Amol Mitkari on Devendra Fadnavis

महाराष्ट्र कर्नाटक सीमाावादच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विधान केले आहे. या विधानावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ असल्याचा त्यांनी आरोप ( MLA Amol Mitkari Alleged on Devendra Fadnavis ) केला आहे.

Border Dispute
देवेंद्र फडवणीस

By

Published : Dec 10, 2022, 4:21 PM IST

Updated : Dec 10, 2022, 5:05 PM IST

आमदार अमोल मिटकरी माध्यमांसोबत संवाद साधताना

सोलापूर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा दिवसेंदिवस ज्वलंत होत चालला आहे. बसवराज बोम्मई यांच्या नवनवीन विधानामुळे हा वाद वाढत चालला आहे. महाविकास आघाडीचे एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटून सीमावादाचा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे. त्यावर एका ट्विटद्वारे बोम्मई यांनी माहिती दिली आहे की, कर्नाटक महाराष्ट्र सीमावादचा प्रश्न उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अमित शहा यांना कोणीही भेटले तरी काहीही फरक पडणार नाही. यामुळे आमच्यावर काहीही फरक पडणार नाही. या विधानावर विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी ( MLA Amol Mitkari ) यांनी संताप व्यक्त केला आहे.

बोम्मईंना देवेंद्र फडणवीसांचे पाठबळ: महाराष्ट्रातील जनतेला मूळ मुद्द्यांपासून दिशाभूल करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय केला जात आहे. हा जो प्रयत्न सुरू आहे,त्यामागे पंतप्रधान मोदींचे तसेच अमित शहा व महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाठबळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ( MLA Amol Mitkari Alleged on Devendra Fadnavis ) केला आहे. भाजपच्या दहशतीखाली असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे का गप्प आहेत? असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

मिटकरींचे भाजपवर आरोप: भारतीय जनता पक्षाला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे धास्ती लागली आहे. कारण भारत जोडो यात्रेमुळे हिमाचल प्रदेशमध्ये भाजपची सत्ता जाऊन काँग्रेसची सत्ता आली आहे. आता काही दिवसांनी कर्नाटकात निवडणूका होणार आहेत. म्हणून अशा मुद्द्यांवर भाजप षडयंत्र करत आहे. भाजप या पक्षामुळे मूळ मुद्दे भरकटत आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

Last Updated : Dec 10, 2022, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details