पंढरपूर (सोलापूर) -मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे संभाजीराजे छत्रपती यांनी बेमुदत उपोषण ( Hunger Strike of Sambhajiraje Chhatrapati ) सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा महासंघाच्या वतीने पंढरपूर बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, पंढरपूर शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
मराठा महासंघाच्या वतीने सोमवारी (दि. 28 फेब्रुवारी) पंढरपूर बंदची हाक दिली. पंढरपूर शहरातील स्टेशन रोड परिसरातील मुख्य बाजारपेठ व्यापाऱ्यांनी बंद ठेवून या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला. छत्रपती मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रकृतीत बिघाड झाला तर त्यास सर्व घटनेस राज्यसरकार जबाबदार राहणार आहे, असेही सांगितले.