सोलापूर- चारदिवसांपूर्वी झालेल्या आषाढीच्या महापूजेदरम्यान ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस या रुक्मिणीच्या महापूजेतून बाहेर निघून गेल्या होत्या. त्यामुळे महापूजेवेळी मंदिरातील अनावश्यक गर्दी आणि ऑक्सिजच्या कमतरतेचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.
Exclusive : 'मिसेस मुख्यमंत्र्यांनी' रूक्मिणीची महापूजा सोडली अर्ध्यावर; 'हे' आहे कारण - rajendra bhosale
चार दिवसांपूर्वी झालेल्या आषाढीच्या महापूजेदरम्यान ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे अस्वस्थ वाटू लागल्याने अमृता फडणवीस या रुक्मिणीच्या महापूजेतूनबाहेर बाहेर निघून गेल्या होत्या.
मंदिरात गर्दीच्यावेळी ऑक्सिजनचा पुरवठा होतो का? याचा गांभीर्याने अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापूजेला व्हीआयपी आणि त्यासोबत मंदिरात किती जणांना प्रवेश द्यावा, रांगेतील भाविक आणि माध्यम प्रतिनिधींची संख्या याबाबत कुठलेच नियम नाहीत. त्यामुळे मंदिरात गुदमरायला होते. असाच अनुभव यावर्षीच्या महापूजेवेळी अमृता फडणवीस यांना आला. त्यामुळे त्या रुक्मीणी मंदिरातून बाहेर निघून गेल्या आणि त्यांनी सहायकास गाडी काढायला सांगितली.
त्यावेळी मंदिरसमितीचे अध्यक्ष अतुल भोसले हेही त्यांच्या तब्येतीच्या काळजीपोटी पाठीमागून धावत गेले. मात्र, अमृता फडणवीस त्यानंतर झालेल्या मंदिरसमितीच्या आणि मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार सोहळ्यालाही आल्या नाहीत. त्यामुळे मंदिरातील ऑक्सिजनचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे आता आषाढी एकादशीच्या महापूजेवेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात किती लोकांनी असावे. याचा आराखडा मंदिर प्रशासनामार्फत तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिर्डी, तिरुपती मंदिराचा अभ्यास केला जाणार आहे. या आराखड्याबाबतची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी माध्यमांना दिली आहे.