महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अभिनव उपक्रमास सोलापूर विद्यापीठात उस्फूर्त प्रतिसाद - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत न्यूज

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे राबविण्यात आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय सोलापूर या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः उपस्थित राहून प्राप्त 871 अर्जापैकी 786 अर्जावर सकरात्मक निर्णय घेतला. या वेळी, अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत न्यूज
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत न्यूज

By

Published : Feb 12, 2021, 6:30 PM IST

सोलापूर - राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे राबविण्यात आलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय सोलापूर या उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः उपस्थित राहून प्राप्त 871 अर्जापैकी 786 अर्जावर सकरात्मक निर्णय घेतला. यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीचीही या परिषदेत घोषणा केली.

उच्च तंत्र शिक्षण मंत्रालयाच्या अभिनव उपक्रमास सोलापूर विद्यापीठात उस्फूर्त प्रतिसाद
उदय सामंत यांच्या उपस्थितीत अर्ज निकाली काढण्यात आले

शुक्रवारी प्रत्यक्ष उच्च व शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अर्ज निकाली काढण्यात आली. 576 अर्जांपैकी 480 अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले. यामध्ये अनेक वर्षे प्रलंबित अनुकंपेच्या तीन प्रकरणामध्ये आज नियुक्ती आदेश देण्यात आले. वैद्यकीय प्रतिपूर्ती दहा व्यक्तींना, भविष्य निर्वाह निधीचे अकरा व्यक्तींना आदेश देण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या अंतरविद्यापीठ बदल्यांसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


विद्यापीठाच्या संवैधानिक पदाला मंजुरी

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या चार संविधानिक पदाच्या भरतीला मंजुरी देण्यात येणार आहे. उर्वरित आकृतीबंधलाही लवकरच मान्यता देण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून मदत करण्यात येणार असून सोलापूर विद्यापीठाने तसा प्रस्ताव सादर केल्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल असे सामंत म्हणाले. तसेच, सोलापूर विद्यापीठमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी बोलताना दिली.

तक्रारदारांच्या समस्या जाग्यावर सोडविण्यात आल्या

मंत्रालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी, संचालक उपस्थित असल्याने तक्रारदारांच्या समस्या जागेवर सोडवण्यात आल्या. यावेळी डॉ. मृणालिनी फडणवीस, उच्च शिक्षण विभागाचे डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, प्रभारी कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, उपसचिव दत्तात्रय कहर आदी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details