सोलापूर- दक्षिण सोलापूर मतदारसंघातून दूसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी कॉंग्रसचे पराभूत उमेदवार बाबा मिस्त्री यांची भेट घेतली. बाबा मिस्त्री सोबतच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्वच विरोधी उमेदवारांची भेट घेत आहेत. यावेळी मिस्त्री यांनी सहकारमंत्र्यांचा सत्कार करत राजकारणातील विरोध बाजूला सारला आहे.
मंत्री सुभाष देशमुख यांनी घेतली कॉंग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री यांची भेट; सोलापूरच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा - दक्षिण सोलापूर मतदारसंघ २०१९
निकालानंतर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसचे उमेदवार बाब मिस्त्री यांची भेट घेतली. त्यांचा सत्कार केला. कॉंग्रेसच्या उमेदवारासोबतच देशमुख यांनी वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांची देखील भेट घेतली. दक्षिण सोलापूर मतदारसंघ तसेच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन विकास करणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून दूसऱ्यांदा निवडून आले आहेत. जवळपास 30 हजार मताधिक्य घेऊन देशमुख यांनी कॉंग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांचा पराभव केला. निकालानंतर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेसचे उमेदवार बाब मिस्त्री यांची आज भेट. कॉंग्रेसच्या उमेदवारासोबतच देशमुख यांनी वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांची देखील भेट घेतली. दक्षिण सोलापूर मतदारसंघ तसेच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन विकास करणार असल्याचे सुभाष देशमुख यांनी यावेळी सांगितले. निवडणूक ही मतमोजणीच्या दिवसापर्यंतच असते. त्यानंतर सर्वांना सोबत घेऊनच विकास करण्यावर आपला भर असल्याचे सांगत सुभाष देशमुख यांनी कॉंग्रेसचे उमेदवार बाबा मिस्त्री आणि वंचितचे उमेदवार यूवराज राठोड यांची भेट घेतली.