सोलापूर -पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी कोरोना वार्डात जाऊन कोरोनाबाधित रुग्णांची विचारपूस केली. जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती घ्यावी, त्यांच्यावर लक्ष ठेवावे, लक्षणे दिसल्यावर त्यांच्यावर उपचार करावे, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केल्या. पालकमंत्री यांच्या सोबत जिल्ह्यातील पदाधिकारी देखील उपस्थित होते.
कोरोनाच्या प्रार्दुभावावर विचार करण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीशी चर्चा केली. या बैठकीत त्यांनी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना सूचना केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागहात ही बैठक झाली. या बैठकीस खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, भारत भालके, शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, संजयमामा शिंदे, यशवंत माने, प्रणिती शिंदे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी उपस्थित होते. याबैठकीत सर्व खासदार, आमदार यांनी आपल्या समस्या सूचना मांडल्या.