सोलापूर- वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सरकार न्याय भूमिका पार पाडेल असा दावा राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सोलापुरात बोलत होते. वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळल्यानंतर सरकारने आता सावध पवित्रा घेतला आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मराठा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सरकार न्याय भुमिकेत - चंद्रकांत पाटील - admission
सरकारने मोठा गाजावाजा करत एसईबीसीचे आरक्षण दिले पण, ते कायद्याच्या कसोटीवर टिकताना दिसत नाही. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना आता वैद्यकीय क्षेत्रात सरकारने देऊ केलेल्या आरक्षणानुसार खरच न्याय मिळणार का ते लवकरच स्पष्ट होईल.
राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (शुक्रवार) सोलापुरात सरकारची बाजू मांडताना वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार असल्याचा दावा केला आहे. 200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळू शकेल असा प्रयत्न करणार असल्याचेही पाटील म्हणाले. उर्वरीत 100 विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला आज पत्र देणार आहेत. सरकार या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे असेही महसुलमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.