सोलापूर- शहर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या काळातही सोलापूर शहर-जिल्ह्यातील खासगी रुग्णालय नागरिकांकडून लुटमारीचा धंदा करत आहेत. काही रुग्णालय चांगले आहेत मात्र, जे खासगी रुग्णालय लुटमारीचा धंदा करत आहेत त्यांना आम्ही सोडणार नाही. लुटीचा तंत्र वापरत असाल तर रुग्णालयावर कारवाई करू, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोलापुरात दिला.
राज्यमंत्री बच्चू कडू हे पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 12 एप्रिल) सोलापूर दौऱ्यावर आले होते. शहरात एका खासगी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडू बोलत होते.
शेजारी असलेल्या हैदराबादमध्ये कोरोना वाढला नाही
आमदार बच्चू कडू म्हणाले, हैदराबादमध्ये गेलो असता त्या ठिकाणी साधा मास्कच कोणी वापरत नाही, तपासणीही होत नाही, व्यापार सुरू आहे, असे तेथील नागरिकांनी सांगितले. अशा ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी मात्र महाराष्ट्र राज्यात कोरोनाची चाचणी मोठ्या प्रमाणात होऊनही प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.
शासकीय योजनेचा लाभ न देणाऱ्या रुग्णालयवर नजर
काही रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना देत नाहीत याकडे आमचे लक्ष आहे. सामान्य नागरिकांना जो कोणी ही योजना लागू करत नाही. त्यांच्यावरही कारवाई करू, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे, मास्क ,सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही आवाहन नागरिकांना केले आहे.
दूध का दूध पानी का पानी करणार
काही साखर कारखान्याचे देणे बाकी आहे. विडी कामगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी माझ्याकडे असंख्य खाते आहेत. त्यामुळे त्याचा केवळ आढावा नाही तर दूध का दूध, पानी का पानी केल्याशिवाय राहणार नाही, असेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
जाणीवपूर्वक चूक केल्यास सोडणार नाही