महाराष्ट्र

maharashtra

Solapur Crime News : सुलेमानी खड्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा

सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी ( Sadar Bazar Police Solapur ) दिव्य शक्ती सुलेमानी खड्याचे ( Divine power agate ) आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीने पुण्यातील फिर्यादी सूर्यकांत बबन आढळगे आणि त्यांचेच केरळातली ग्राहक अशा सर्वांची फसवणूक या टोळीने केली. सुलेमानी खड्याची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. तरी आरोपींनी खड्याचे आमिष दाखवून आरोपींनी एकूण 12 लाख रुपयांना गंडा ( Fraud of Rs 12 lakh ) घातला होता. तरी सदर बाजार पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

By

Published : Jul 3, 2022, 11:05 AM IST

Published : Jul 3, 2022, 11:05 AM IST

Updated : Jul 3, 2022, 11:23 AM IST

Fraud in Solapur
सोलापुरात फसवणूक

सोलापूर - सुलेमानी खड्याचे आमिष दाखवून पोलिसांच्या खबऱ्यानेच पुण्यातील एका व्यक्तीची पाच लाख रुपयांची फसवणूक ( Divine power agate ) केली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत 1 जुलै रोजी गुन्हा दाखल होताच तीन संशयित आरोपींना ताब्यात घेत दोन तासांत गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये पोलिसांनी ( Sadar Bazar Police Solapur ) इमरान इलाई पठाण (वय 37 वर्ष, रा शास्त्रीनगर, सोलापूर), जफर उर्फ सिराज मोहम्मद हाशम शेख (वय 57 वर्ष, रा. केशवनगर, दक्षिण सदर बाजार, सोलापूर), सलमान जैनोद्दीन नदाफ ( Imran Ilai Pathan police reporter ) (वय 26 वर्ष, रा, सिद्धेश्वरनगर भाग 5, सोलापूर) या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत पोलिसांनी शनिवारी 2 जुलै रोजी अधिकृत माहिती दिली.

सोलापुरात फसवणूक

सुलेमानी खड्यासाठी पुण्याहून सोलापुरात : सूर्यकांत बबन आढळगे (वय 42 रा., हडपसर, पुणे) हे दिव्य शक्ती असलेल्या सुलेमानी खड्यासाठी सोलापुरात आले होते. सूर्यकांत हे पुणे येथे जमीन विक्रीच्या व्यवसायात कमिशन एजंटचे काम करतात. सुलेमानी खड्याच्या विक्रीमधून मोठा लाभ मिळेल, या आशेपोटी त्यांनी सुलेमानी खड्यासाठी केरळ राज्यातील ग्राहकदेखील बघितला होता. 28 जून 2022 रोजी सूर्यकांत आढळगे हे सोलापुरातील नामांकित हॉटेल लोटसमध्ये मुक्कामी आले होते. जफर उर्फ सिराज शेख याने सुलेमानी खड्याचे आमिष दाखवले होते. ऑनलाइनरीत्या जफर शेख आणि सूर्यकांत यांचे संपर्क झाले होते. पण, जफर शेख याने सुलेमानी खड्याच्या निमित्ताने वेगळाच प्लॅन आखला होता. दोघांमध्ये झालेल्या व्यवहाराने या सुलेमानी खड्याची किंमत 5 लाख रुपये ठरविण्यात आली होती. आणि तो सुलेमानी खडा किंवा सुलेमानी पत्थर सूर्यकांत आढळगे केरळ राज्यातील ग्राहकाला 7 लाख रुपयांना विक्री करणार होते. ( Divine power agate )

सुलेमानी खडा दाखवण्याअगोदर पाच लाख रुपये मागितले : संशयित आरोपी जफर उर्फ सिराज याने सुलेमानी खडा माझ्याकडे आहे, असे सांगत लोटस हॉटेल येथे गेला. हा खडा दाखवण्याअगोदर पाच लाख रुपये दाखवा मगच खडा दाखवतो, असे सांगितले. त्यावेळी सूर्यकांत आढळगे यांनी पाच लाख रुपयांची बॅग दाखवली आणि त्यामधील रोख रक्कम दाखवली. केरळ राज्यातून आलेले ग्राहकदेखील सुलेमानी खडा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते.


पोलिसांचा खबऱ्याच क्राईम ब्रँचचा अधिकारी बनून पोहोचला : दिव्य शक्ती असलेल्या सुलेमानी खड्याची तस्करी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. हा व्यवहार अतिशय गुप्त पद्धतीने सुरू होता. पण, ऐनवेळी पोलिसांचा खबरी म्हणून काम करणारा इमरान इलाई पठाण हा सलमान नदाफ याला सोबत घेऊन क्राईम ब्रँचचा तोतया अधिकारी बनून घटनास्थळी पोहोचला आणि सर्व जणांना अटक करायचे आहे, असे सांगू लागला. यामुळे केरळ राज्यातील चार इसम आणि सूर्यकांत आढळगे हे घाबरून गेले आणि पळापळ करू लागले. या झटापटीत जफर उर्फ सिराज शेख आणि इमरान इलाई पठाण याने पाच लाख रुपयांची बॅग हिसकावून घेतली. स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्याकरिता सुलेमानी खडा खरेदीसाठी आलेल्यांनी पाच लाख रुपये सोडून पळून गेले.


हॉटेल मॅनेजरने धीर देत फिर्याद देण्यास सांगितले : सूर्यकांत आढळगे हे 28 जून 2022 रोजीच पोलिसांच्या भीतीने सोलापुरातून पळून गेले होते. पण, ही झटापट, गोंधळ हॉटेल मॅनेजरने पाहिले होते. लोटस हॉटेलच्या मॅनेजरने सूर्यकांत आढळगे यांच्याशी संपर्क करून त्यांना पुन्हा सोलापुरात बोलावून घेतले आणि सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद देण्यास सांगितले. 1 जुलै रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंद झाली. पोलिसांनी ताबडतोब तपासाची चक्रे फिरवली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. सीसीटीव्ही पाहिले असता त्यांचा खबरीच दिसल्याने पोलिसांना धक्का बसला.

पोलिसांकडून आरोपींना अटक : सदर बाजार पोलिसांनी ताबडतोब खबऱ्या इमरान पठाण यास ताब्यात घेतले आणि बाकीच्या तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पाच लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली. गुन्हा दाखल होताच दोन तासांत तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. तिघा संशयितांना कोर्टात हजर केले असता 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पीएसआय सचिन माळी करीत आहेत.


सुलेमानी खडा असल्याचे खोटं आमिष :पोलिसांनी कसून तपास केला असता या संशयित आरोपींकडे कोणत्याही प्रकारचा दिव्य शक्ती असलेला सुलेमानी खडा नव्हता. फसवणूक करून लुबाडण्यात आलेली सर्व पाच लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली. याचा तपास करताना पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले, पीएसआय सचिन माळी, औदुंबर आटोळे, इसाक नदाफ, शाहजहान मुलाणी, राजेश चव्हाण, सागर सरतापे, सैपन सय्यद, राम भिंगारे, विठ्ठल काळजे, मल्लू बिराजदार, अब्रार दिंडोरे आदींनी महत्त्वाची कामगिरी बजावली. डीसीपी डॉ. वैशाली कडुकर यांनी उलट आवाहन करीत सांगितले की, कष्टशिवाय मार्ग नाही. नागरिकांनी पैसे कमविण्यासाठी असे शॉर्टकट वापरू नये, असे आवाहन केले.

हेही वाचा :Crime: पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने 56 लाखांची फसवणूक; तीन जणांना ठोकल्या बेड्या

Last Updated : Jul 3, 2022, 11:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details