पंढरपूर- तालुक्यातील कासार ओढामध्ये स्थलांतरित करणाऱ्या रंगीत करकोचा या पक्ष्याचा बर्ड फ्ल्यू सदृश्य रोगामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांची मरण्याची संख्या तीन झाली आहे. पक्ष्यांना बर्ड फ्ल्यू संदर्भाचा अहवाल येणे बाकी आहे. पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे सतरा कोंबड्यांचा फ्लूमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आता स्थलांतरित पक्षातही बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची भीती व्यक्त केली आहे.
पंढरपूर तालुक्यात स्थलांतरित पक्ष्याचा संशयास्पद मृत्यू; बर्ड फ्ल्यूची भीती - pandhrpur latest news
पंढरपूर तालुक्यातील नेपतगाव येथे सतरा कोंबड्यांचा फ्लूमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे आता स्थलांतरित पक्ष्यातही बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रंगीत करकोच्या पक्षाचा संशयितरित्या मृत्यू-
पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, वाखरी येथील कासाळ ओढा तसेच पंढरपूर शहरातील यमाई तलाव परिसरात विविध रंगाच्या छटा असलेले स्थलांतरीत पक्षी मोठ्या संख्येने पाहावयास मिळतात. रंगीत करकोचा हा दिसायला अत्यंत आकर्षक व देखणा असतो. मासे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. राज्यामध्ये बर्ड फ्ल्यूचे सावट आहे. कासाळ ओढ्याजवळ रंगीत करकोचा मृत्यू पावल्याचे आढळले. सलग दुसर्या दिवशी संशयास्पदरित्या या पक्षाचा मृत्यू झाल्याची घटना आहे.
दोन पक्षांचा अहवाल प्रलंबित
एक मृत पक्षी वनविभागाचे वनपाल सुनिता पत्की या पुणे येथे तपासणीसाठी पाठवून दिला आहे. पुणे येथून तो पक्षी अधिकच्या तपासणीसाठी भोपाळकडे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल प्रलंबित आहे. परंतु सोमवारी पुन्हा संशयास्पदरित्या तिसरा पक्षी मृत आढळून आला आहे. जोपर्यंत पहिल्या पक्षाचा अहवाल प्राप्त होत नाही. तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचे पशुधन विकास आधिकारी डॉ. प्रवीण खंडागळे यांनी सांगितले आहे.