सोलापूर - पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडमधून काम करण्यासाठी सोलापुरात आलेल्या मजुरांचा संयम सुटला आहे. त्यामुळे या परप्रांतीय मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला आहे. अख्खा संसार डोक्यावर आणि लहान मूल कंबरेवर घेऊन ही जोडपी शेकडो किलोमीटर पायी जायला निघाली आहेत. 40 अंशाहून अधिक तापनातही मजूर पायी चालत असताना यांची ही हाल अपेष्टा कोणालाच दिसत नाहीत हे मोठे दुर्दैव आहे.
संसार अन् मुलांना सोबत घेत सोलापूरहून ते पायी निघाले छत्तीसगडला - सोलापूर ते छत्तीसगड पायी प्रवास
कोरोनाच्या पार्श्वभूमी सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक परप्रांतीय मजुरांची उपासमार होत आहे. त्यामुळे मिळेल त्या वाहनाने किंवा पायी आपले घर गाठण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. असेच दोन जोडपे आपल्या मुलांसह आणि संसारासह पायी छत्तीसगडला निघाले आहेत.
सोलापूर शहरातील जुळे सोलापूर भागात हे मजुरवर्ग मिळेल ते काम करत आपल्या संसाराचा गाढा ओढत होते. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सुरु झाली. साठवलेल्या पैशातून कसेबसे पन्नास दिवस निघाले. जवळचे अन्न व पैसे संपत आले. त्यामुळे त्यांच्या संयमाचा बांधही सुटला. संसारोपयोगी साहित्याचे गाठोडे डोक्यावर तर लहान मुलं कधी चालत तर कधी कमरेवर, असा पायी प्रवास सुरु झाला आहे. काहीही झाले तरी आपले गाव गाठणार या निर्धाराने या मजुरांनी छत्तीसगडच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
हेही वाचा -विठ्ठल रुख्मिणीच्या गाभाऱ्यास ३१०० हापूस आंब्याची आरास; विठ्ठल मंदिराला आले आमराईचे रूप