सोलापूर - बार्शीसारख्या ग्रामीण भागात साकारला गेलेला 'म्होरक्या' हा मराठी चित्रपट येत्या २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे. शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे रविवारी दुपारी'म्होरक्या'च्या टीमचा सोलापूरकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला
यावेळी, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. शिरीष वळसंगकर, शिवसेनेचे महेश कोठे, ॲड. बसवराज सलगर, ॲड. संदीप संगा, ॲड. रवी सरवदे, निर्माते युवराज सरवदे, श्रीनिवास संगा, व्यंकटेश पडाल, दिग्दर्शक अमर देवकर, गीत दिग्दर्शक वैभव शिरोळे, संतोष संगा, गणेश आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर्स,ट्रेलर आणि ऑडिओ साँग लॉन्च करण्यात आले.
हेही वाचा -'शेवटी दोन एकर शेती गहाण टाकली आणि 'म्होरक्या'चं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण केलं'
यावेळी, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. शिरीष वळसंगकर, शिवसेनेचे महेश कोठे, ॲड. बसवराज सलगर, ॲड. संदीप संगा, ॲड. रवी सरवदे, निर्माते युवराज सरवदे, श्रीनिवास संगा, व्यंकटेश पडाल, दिग्दर्शक अमर देवकर, गीत दिग्दर्शक वैभव शिरोळे, संतोष संगा, गणेश आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर्स,ट्रेलर आणि ऑडिओ साँग लॉन्च करण्यात आले. त्यानंतर चित्रपटातील बालकलाकार रमण देवकर, ऐश्वर्या कांबळे, अनिल कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्यासह सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.