पंढरपूर (सोलापूर) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. यामुळे पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असलले सर्व व्यापार ठप्प असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांवर उपासमारिची वेळ आली आहे. त्यामुळे मंदिर सुरू करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून जोर धरत आहे.
विठ्ठल मंदिर उघडा, व्यापाऱ्यांची मागणी - solapur news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे बंद आहेत. यामुळे मंदीर व ब भाविकांवर आधारित असलेले सर्व व्यापार ठप्प आहेत. यामुळे उपासमारीची वेळ आली असून मंदिर सुरू करण्याची मागणी व्यापारी राज्य सरकारकडे करत आहेत.
मंदिरात येणारे भाविक मंदिरात जाताना पांडूरंगाच्या चरणी बत्ताशे, पेढे चढवतात. तसेच मंदिरात जाताना तुलशी माळ, फुलांची माळ, उदबत्ती, नारळ घेतात. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे या सर्व व्यापाऱ्यांचे लाखोंचे व्यवहार ठप्प झाले आहेत. काहींना उदरनिर्वाहासाठी उसने पैसे घ्यावे लागत आहेत तर काहींनी पारंपारी व्यवसायाला फाटा देत हंगामी व्यवसाय सुरू केले आहे. या व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या कामगारांना पगार देण्यासही अडचणी निर्माण झाली आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांवर अवलंबून असलेले व्यवसाय, व्यापार व त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्यांचेच मोठे हाल होत आहेत.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी राज्यातील मंदिरे सुरू करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने जर मंदिर सुरू झाले तर पूर्वप्रमाणे व्यापार सुरू होईल. परिणामी आर्थिक गाडा सुरळीत चालेल. यामुळे व्यापाऱ्यांकडून विठ्ठल मंदिर सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.