महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवगंत आमदार भारत भालके यांच्या कुटुबियांना विधानमंडळाचे स्मृतीपत्र सुपूर्द - सोलापूर जिल्हा बातमी

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांना विधिमंडळाकडून स्मृतीपत्र सुपूर्त करण्या आले आहे. हे स्मृतीपत्र आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते भालके कुटुंबियांना देण्यात आले आहे.

स्मृतीपत्र देताना
स्मृतीपत्र देताना

By

Published : Mar 1, 2021, 2:41 AM IST

पंढरपूर (सोलापूर) -पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबियांना विधिमंडळाकडून स्मृतीपत्र सुपूर्त करण्यात आले. जयश्री भालके यांच्याकडे स्मृती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.

विधिमंडळाकडून दिवंगत आमदारांच्या कुटुंबियांना दिले जाते स्मृतीपत्र

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा व विधानपरिषदेतील विद्यमान सदस्य किंवा माजी सदस्यांचे निधन झाल्यास त्या निधनाबद्दल संबधित सभागृहात शोक प्रस्ताव संमत करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येते. त्याअनुषंगाने विधिनमंडळाने तयार केलेले स्मृतीपत्र दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले.

आमदार परिचारक यांच्या हस्ते स्मृतीपत्र

महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्देशानुसार दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांना स्मृतीपत्र व विधानसभा सभागृहात झालेल्या शोकप्रस्तावाच्या कार्यवाहीची प्रत आमदार प्रशांत परिचारक व प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते जयश्री भालके यांना देण्यात आले.

हेही वाचा -पेट्रोलपंपावर प्रतिकात्मक चूल मांडून राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा गॅस दरवाढीला विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details