महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वारीत प्रमुख ठिकाणी वारकऱ्यांना थेट स्क्रिनद्वारे विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन - डॉ. अतुल भोसले

विठ्ठल मंदिर समितीची गुरूवारी आषाढी पूर्व बैठक संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरातील प्रमुख ठिकाणी वारकऱ्यांना विठ्ठल रुख्मिणीचे स्क्रिनद्वारे थेट दर्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

डॉ. अतुल भोसले

By

Published : Jun 7, 2019, 3:05 AM IST

सोलापूर - विठ्ठल मंदिर समितीची गुरूवारी आषाढी पूर्व बैठक संपन्न झाली. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरातील प्रमुख ठिकाणी वारकऱ्यांना विठ्ठल रुख्मिणीचे स्क्रिनद्वारे थेट दर्शन देण्यात येणार असल्याची माहिती मंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.

गतवर्षीपेक्षा यावेळी अधिक भाविक येतील असा अंदाज आहे. येणाऱ्या भाविकांना पदस्पर्श दर्शन मिळाले नाही तरी भाविकांना स्क्रीनद्वारे दर्शन देण्याची सुविधा होणार आहे. शेगाव येथील गजानन महाराज संस्थानमध्ये ज्या पध्दतीने महाराष्ट्रातील भक्त जाऊन सेवा देतात. त्याच पद्धतीने पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातही अशा पध्दतीने सेवा भाविकांना करता येईल. येथे येऊन धार्मिक ग्रंथ, पोथी वाचन तसेच दर्शनास आलेल्या भाविकांची सेवा करता येईल. त्यासाठी त्या सेवकास सर्व सुविधा मंदिर समिती देणार असल्याचेही अतुल भोसले यांनी सांगितले.

वारीत वारकऱ्यांना थेट स्क्रिनद्वारे विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन - डॉ. अतुल भोसले

अवघ्या महिनाभरावर आलेल्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मंदीर समिती आणि प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी कामाला लागले आहे. आज झालेल्या बैठकीस मंदीर समितीचे सदस्य गहिनीनाथ औसेकर, शिवाजी मोरे महाराज, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संभाजी शिंदे, दिनेश कदम, माधवी निगडे, साधना भोसले, शकुंतला नडगिरे तसेच मंदिर समितीचे अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details