सोलापूर- मंगळवेढा तालूक्यातील भाळवणी येथील फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. आज (सोमवार) सकाळी झालेल्या या स्फोटात कारखान्यातील सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. या स्फोटात नेमके नुकसान किती झाले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
सोलापुरातील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट - फटाके
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील सागर फायर वर्क्स या कंपनीतील फटाक्यांचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. याच कंपनीमध्ये दोन महिन्यापूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर आजची ही दुसरी घटना आहे.
मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील सागर फायर वर्क्स या कंपनीतील फटाक्यांचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात सर्व फटाके जळून खाक झाले आहेत. याच कंपनीमध्ये दोन महिन्यापूर्वी स्फोट झाला होता. त्यानंतर आजची ही दुसरी घटना आहे.
सागर फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्यात पूर्वी स्फोट झाल्यानंतर हा कारखाना बंद ठेवण्याचे आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी दिले होते. जिल्हाधिकारी यांनी कारखाना बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही हा कारखाना सुरू होता की कारखान्यात स्टॉक असलेल्या फटाक्यांचा हा स्फोट झाला आहे. या बाबत माहिती अजून स्पष्ट झालेली नाही.