महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नागरिकांना मास्क किंवा रुमाल कापडाने तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणाऱ्या प्रत्येकांने मास्क किंवा रूमाल वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By

Published : Apr 9, 2020, 11:18 PM IST

सोलापूर- शहर आणि जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्क किंवा रुमाल कापडाने तोंड झाकून वावरणे बंधनकारक करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक कामासाठी बाहेर येणाऱ्या प्रत्येकांने मास्क किंवा रूमाल वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आदेश दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अजून तरी कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाचा प्रार्दूभाव होऊ नये यासाठी आता सोलापूर जिल्ह्यात मास्क किंवा रूमाल आणि कापडाने तोंड झाकून ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा आदेश सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी काढला.

सोलापूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मास्क आवश्यक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मास्क मानांकित प्रतीचे अथवा घरगुती पद्धतीने तयार केलेले असावेत. मास्क योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जंतूक करुन पुन्हा वापर करता येणारा असावा. शासकीय अधिकारी कर्मचारी यांना बैठकीस उपस्थित राहताना अथवा शासकीय वाहनाने प्रवास करताना मास्क वापरणे बंधनकारक राहील.

ABOUT THE AUTHOR

...view details